उस्मानाबाद, दि. 06 : जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2020 साठी सोयाबीन पिकांचे 1000 एकर इतका लक्षांक देण्यात आलेला होता परंतु दिलेला लक्षांक अपुरा पडत असल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून बीजोत्पादन कार्यक्रमाकरिता 800 हेक्टर इतका अतिरिक्त लक्षांक देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांन मधून होत आहे. रब्बी हंगाम 2020 करीता अतिरिक्त 800 हेक्टर एवढा लक्षांक वाढवून देण्यात यावा अशी मागणी जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निवेदनाद्वारे महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्याकडे केली आहे.
