उस्मानाबाद, दि. 19 : नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार हे दोन दिवस उस्मानाबाद जिल्ह्यात आले होते. मात्र सोमवार दि. 19 रोजी दुस-या दिवशीचा पाहणी दौरा रद्द केला आहे.
हे ही वाचा - अतिवृष्टी भागातील शेतक-यांच्या मदतीकरीता पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार - शरद पवार
शरद पवार हे आज परंडा तालुक्याच्या पाहणी दौ-यावर जाणार होते. मात्र परंड्यात रविवारी झालेल्या पावसामुळे हेलिपॅड खराब झाल्याने तिथे हेलिकॉप्टर उतरण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा दौरा खासदार शरद पवार यांना रद्द केला आहे. त्यामुळे खा. शरद पवार हे बारामतीला रवाना झाले असून पुन्हा राहिलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी लवकरच येणार असल्याचे आश्वासनही पवार यांनी यावेळी दिले.
हे ही वाचा - शरद पवार यांनी केली काक्रंबा शिवारातील अतिवृष्टीग्रस्त शेताची पाहणी
हे ही वाचा - उस्मानाबाद : मंत्री देशमुख,बनसोडे यांच्यासह खा.शरद पवार यांनी नुकसान ग्रस्त भागाची केली पाहणी