उस्मानाबाद,दि. 19 ते दि. 22 ऑक्टोबर या कालावधीत हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्हयात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच सध्या जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरलेले असून प्रकल्पातील सांडव्यातून पाण्याचा विसर्ग चालू आहे. यामुळे नदया, नाले भरुन वाहत आहेत. त्यामुळे या कालावधीत पडणा-या पावसामुळे अचानक नदी, नाले यांना पुर वाढण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या ग्रामस्थांनी व इतर नागरिकांनी नदी, नाल्याकडे जाऊ नये. तसेच नदी नाल्यापासून दूर राहावे व जिवीतहानी टाळावी, आपले पशुधन सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावे, असे आवाहन उस्मानाबाद पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.