उस्मानाबाद : महेश पाटील
परतीच्या पावसाने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहेत. काही शेतक-यांनी सोयाबिन पिक काढून ठेवली तर काहींनी शेतात मळणीसाठी ढिग शिवारात झाकून ठेवली. मात्र परतीच्या पावसामुळे ढिगा-याखाली पाणी गेल्याने सोयाबीन भिजून नुकसान झाले. तर ऊसाचे फडही जमीन दोस्त झाले. त्यामुळे तात्काळ पिकांचे पंचनामे युध्द पातळीवर करून शेतकरी बांधवांना आधार दयावा, अशा सुचना जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण बसवराज पाटील यांनी दिल्या.
उमरगा तालुक्यातील बेळंब व केसरजवळगा अतिवृष्टीमुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात शेतीचे, पिकांचे झालेल्या नुकसानीचे जि.प. विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी पाहणी करुन शेतक-यांशी संवाद साधला. उमरगा तालुक्यातील पाच ही मंडळात अतिवृष्टीमुळे नोंद झाली आहे. शेतकरी बांधवांचे आतोनात हाल झाले आहेत. काही ठिकाणी पूल वाहून गेलेत तर काही ठिकाणी शेतातील माती वाहून गेली. पुराच्या पाण्यात 62 हून अधिक जनावरे वाहून गेली. 15 दिवसावर रब्बीची पेरणी आल्याने शेतकरी सध्या चिंताग्रस्त असताना अस्मानी सुलतानी संकटाना सामोरे जावे लागत आहे. तरी प्रशासनाने त्यात मुरूम मंडळातील परतीच्या पावसाने झालेल्या सोयाबीन, ऊस पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई दयावी, असे जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते शरण पाटील यांनी पाहणी दौ-यादरम्यान सांगितले.
बेळंब, केसरजवळगा शिवारातील पाहणी दौ-यादरम्यान उमरगा पंचायत समिती सभापती सचिन पाटील, गटविकास अधिकारी कुलदिप कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य उल्हास घुरघुरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव महालिंग बाबशेट्टी, केसरजवळगा सरपंच गोविंद पाटील, बेळंबचे सरपंच महानंद कलशेट्टी, राजू मुल्ला, प्रभाकर पाटील यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..
15 दिवसावर रब्बीची पेरणी आली आहे. त्यातच 60 ते 70 हून अधिक पशुधन पाण्यात वाहून गेल्याने असमानी सुलतानी संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. तरी शासनाने रब्बी पेरणी पूर्वी तात्काळ नुकसान भरपाई द्यावे, असे शरण बसवराज पाटील यांनी "तुळजापूर लाईव्ह" शी बोलताना सांगितले.
