लोहगाव : निजाम शेख
गत दोन दिवसापूर्वी झालेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील लोहगावसह परीसरात पाणीच पाणी झाले असून परीसतील नदी, नाले, ओढे, प्रकल्प ओसांडून वाहत आहेत. बुधवार (दि.१४) रोजी कुरनुर प्रकल्पाला जोडणा-या बोरी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे लोहगाव शिवारात नदी शेजारी असलेल्या शेतातील कोठयात राहात असलेल्या एका कुटुंबातील अंध व्यक्तीसह तिघेजण पुरात अडकले होते. बघता बघता पाण्याचा प्रवाह इतके वाढले कि त्या अंध व्यक्तीसह कुटुंबातील इतर तिघांना तिथून निघणे शक्य झाले नाही. त्यामुळे पुरात अडकले. प्रसंगी शेजारी शेतात असलेल्या लोहगावच्या माजी उपसरपंच भिवाजी इंगोले यांनी पुरात पोहत जावून स्वत:चे जीव धोक्यात घालत चौघांना सुखरूप बाहेर काढले.
भिवाजी इंगोले यांच्यामुळे प्रसंगी माणुसकीचे पुन्हा दर्शन घडले असून जागतिक अंध दिनाच्या पार्श्वभूमीवर कृतीतून अंध व्यक्तीविषयी आपली कृतज्ञता दाखविल्याने इंगोले यांचे सर्वञ कैतुक होत आहे. तर तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटिल यांनीही इंगोले यांना संपर्क करून त्यांचे कौतुक केले आहे.
