उस्मानाबाद, दि. 10 : निसर्गाच्या लहरीपणामुळे अन्य पिकांसोबतच फळपिकांचे ही मोठे नुकसान होत आहे. असे संकट आल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडू नये यासाठी शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत द्राक्षे, केळी, आंबा, डाळिंब, व मोसंबी पिकाचा समावेश करण्यात आला आहे.

सदर योजनेअंतर्गत आंबिया बहार सन 2020- 21 हंगामात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना द्राक्षे,मोसंबी,केळी फळपिकासाठी विमा प्रस्ताव बँकेत दाखल करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2020, डाळिंब, आंबा पिकासाठी विमा प्रस्ताव दाखल करण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2020 आहे.

 
Top