तुळजापूर, दि. 30 : भारत मुरलीधर देवकर, रा. कार्ला, ता. तुळजापूर यांच्या तुळजापूर येथील आडत दुकानावर दि. 26.10.2020 रोजी भिमराव बाबुराव टकले, रा. मानेवाडी, ता. तुळजापूर यांनी सोयाबीन विक्री केले होते. त्याचे 75,000 ₹ मोबदला रक्कम भारत देवकर यांनी ऑनलाईन पध्दतीने भिमराव टकले यांच्या बँक खात्यावर स्थलांतरीत करतांना अनावधानाने शुन्य जास्त लिहीला त्यामुळे 75,000 ₹ ऐवजी 7,50,000 ₹ अशी रक्कम स्थलांतरीत झाली. अशा प्रकारे 6,75,000 ₹ वाढीव रक्कम भिमराव टकले यांच्या बँक खात्यावर जमा झाली.
हा प्रकार लक्षात येताच भारत देवकर यांनी भिमराव यांना फोन करुन ही हकीकत सांगीतली व अनावधानाने जास्त दिली गेलेली 6,75,000 ₹ रक्कम परत करण्यास सांगीतले परंतु भिमराव टकले यांनी रक्कम परत करण्यास मनाई केली. अशा मजकुराच्या भारत देवकर यांनी दि. 29.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 406 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.