तुळजापूर : कुमार नाईकवाडी
तुळजाई नागरी सहकारी पतसंस्था तुळजापूर (खुर्द) व नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द )यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 26 रोजी नेट परीक्षा उत्तीर्ण व इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगर पालिका तुळजापूरच्या शिक्षण सभापती सौ. मंजुषाताई प्रसादराव देशमाने या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगरसेवक पंडितराव जगदाळे, संचालक धनंजय कुंभार, महेश व्हटकर हे उपस्थित होते.
या नेट परीक्षा मधील उत्तीर्ण विद्यार्थी कु. वैष्णवी महेश खुरुद, शुभम धनंजय कुंभार, कु. शांभवी शशिकांत जोशी या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह शाल, पुष्पगुच्छ आणि आणि पुस्तक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. नेट परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 तुळजापूर(खुर्द) येथील सहशक्षक अशोक बाबुराव शेंडगे व सौ. निर्मला वल्लभराव कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
याच कार्यक्रमात इयत्ता पाचवीच्या परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांमध्ये कु. निशा निलेश एकदंते, कु. अंतरा प्रमोद क्षिरसागर, समर्थ सुभाष फुलारी, शुभांगी समाधान जगदाळे, गायत्री संतोष चौधरी, शिवम संजय शिंदे या विद्यार्थ्यांचा पालकांसह पुष्पगुच्छ शाल, पेन बॉक्स भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सदरील विद्यार्थ्यांना राऊत जे.एन., निडवंचे व्ही.ए., मुख्याध्यापक मोटे टी. डी. यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक शेंडगे यांनी केले तर आभार पतसंस्थेचे सचिव संजय ढवळे यांनी मानले. सदरील कार्यक्रमास नागरी सहकारी पत संस्थेचे कर्मचारी तसेच नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द)चे शिक्षक उपस्थित होते. या नेट परीक्षेत वैष्णवी महेश खुरुद(595), शुभम धनंजय कुंभार (580), शांभवी शशिकांत जोशी (520) गुण प्राप्त करणारे हे विद्यार्थी नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द) शाळेमध्ये शिकलेले आहेत.