तुळजापुर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जणांचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात शारदीय नवराञ महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दि. 22  गुरुवार रोजी शेषशाही अलंकार महापुजा मांडण्यात आली होती.

"भगवान विष्णु शेष शैय्ये वरती विश्राम करीत असताना मातेने त्यांच्या नेञ कमळात विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या मलया पासुन निर्माण झालेल्या दोन दैत्याचा वध केला. या वेळी ब्रम्हदेवाने श्री देवीची स्तुती करुन देवीस जागे केल्यावरती आई अंबा मातेने त्याचा वध केला. त्यानंतर भगवान विष्णुनी आपली शैय्या श्री देवीजीस अर्पण केली, अशी अख्यायिता आहे. म्हणून शेषशाही अलंकार महापुजा  मांडण्यात आली होती.

तत्पुर्वी पहाटे श्री देवीचे चरण तिर्थ होऊन सकाळी पंचामृत दुग्धा अभिषेक करुन श्री देवीजीस हिरे जडीत वस्ञोअलंकार शालु (पैठणी) परिधान करण्यात आले. त्यानंतर श्री देवीजीस छञपती शिवाजी महाराजानी दिलेले मौल्यवान दागिने घालण्यात आले. धुप आरती करवुन अंगारा काढण्यात आला. शारदीय नवराञ महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सहाव्या माळेची नित्योपचार पुजा करवुन सिंह गाभाऱ्यातील घटास सहाव्या व्या माळेची फुलाची माळ घालण्यात आली.

या वेळी श्री तुळजाभवानी मातेचे महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजी बुवा, पाळीचे मुख्य भोपे पुजारी शशीकांत बाबुराव पाटील, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर, दिनेश परमेश्वर, सचिन परमेश्वर, संजय सोंजी, समाधान परमेश्वर, अतुल मलबा, प्रशांत सोंजी आदीसह मुख्य भोपे पुजारी बांधवानी श्री तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापुजा मांडली होती. या धार्मिक पुजेच्या सोहळ्या दरम्यान श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे तहसीलदार सौदागर तांदळे धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले आदीसह मंदीर कर्मचारी, सेवेदार श्याम चोपदार, दुर्गेश छञे, गणेश चोपदार, नितीन पोहेकर पलंगे आदीसह सेवेदार, पाळीकर पुजारी उपस्थित होती. 

व्हिडिओ पहा -

संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे मोजक्याच पुजारी बांधवाच्या उपस्थित शारदीय नवराञ महोत्सवाच्या धार्मिक सोहळ्याची नित्योपचार पुजा सकाळी व संध्याकाळी करण्यात येत आहे. गुरुवारी सायंकाळी प्रक्षाळ पुजेस प्रारंभ होवून श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात सहाव्या माळेचा छबिना काढण्यात आला.

शुक्रवार दि. 23 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापुजा, शनिवार दि. 24 रोजी दुर्गाष्टमी दिनी महिषासुर मर्दिनी अलंकार महापुजा व रविवार दि. 25 रोजी खंडे महानवमी दिनी होमावर धार्मिक विधी संपन्न होणार आहे. रविवारी घटोथ्यापन होणार असून दि.26 सोमवार रोजी पहाटे सिमोल्घंन होणार आहे.

 
Top