तुळजापुर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजा भवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या रविवार दि. १८ रोजी दुसऱ्या माळे दिनी पुणे येथील भक्ताकडून श्रद्धेपोटी आकर्षक फुलाची सजावट करण्यात आली होती.  तत्पुर्वी पहाटे १ वाजता श्री देवीचे चरणतिर्थ होऊन श्री तुळजाभवानी मातेचे दार घुले करण्यात आले होते. सकाळी ६ वाजता श्री देवीजीस पंचामृत दुग्धा अभिषेक घालुन वस्ञौअलंकार पुजा करुन धुपारती करवुन शारदीय नवराञ महोत्सवाची दुसऱ्या माळेची नित्योपचार पुजा करण्यात आली होती. 

श्री तुळजाभवानी मातेचा गाभारा आकर्षक फुलानी सजावट केला होता. तसेच राजेशहाजी महाद्वार समोर छञपती शिवाजी महाराज व श्री तुळजाभवानी मातेची डिजाईन बोर्ड वरुन आकर्षक फुलाची रंगीबेरंगी सजावट करण्यात आली होती. 

संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे पाच कि.मी. अंतरावर बॅरिकेटस लावुन भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही, असा दावा पोलीस प्रशासन व महसुल यांनी केला होता. तो दावा फोल ठरल्याचे चित्र पहावयास मिळाले. तुळजापुरात नजर चुकवून मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केल्याची दिसून आले. 

श्री तुळजाभवानी देवीची विविध अलंकार पूजेस दि. 20 ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे. यात, दि.20 ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापूजा, दि. 21 ऑक्टोबर रोजी मुरली अलंकार महापूजा, दि.22 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, दि. 23 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि.24 ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.

व्हिडिओ पहा -





 

 
Top