तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात शारदीय नवराञ महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि. 21 रोजी मुरली अलंकार महापुजा मांडण्यात आली होत. भगवान श्री कृष्णाची श्री देवी वर अपार श्रद्धा असल्याने भगवान श्री कृष्णाने श्री देवीजीस आपली बासरी अर्पण केली होती, अशी अख्यायिका आहे. म्हणून मुरली अलंकार महापुजा मांडण्यात आली होती.
तत्पुर्वी पहाटे श्री देवीचे चरण तिर्थ होऊन सकाळी पंचामृत दुग्धाभिषेक करुन श्री देवीजीस हिरे जडीत वस्ञोअलंकार शालु (पैठणी) परिधान करण्यात आले. त्यानंतर पाचव्या माळेची नित्योपचार पुजा करुन धुपारती करण्यात आली. यानंतर श्री देवीजीस छञपती शिवाजी महाराजानी दिलेले मौल्यवान दागिने घालण्यात आले.
या वेळी श्री तुळजाभवानी मातेचे महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजी बुवा, पाळीचे मुख्य भोपे पुजारी शुभम दताञय कदम, दिनेश परमेश्वर, सचिन परमेश्वर, संजय सोंजी, समाधान परमेश्वर, अतुल मलबा, प्रशांत सोंजी आदीसह मुख्य भोपे पुजारी बांधवानी श्री तुळजाभवानी मातेची मुरली अलंकार महापुजा मांडली होती. या धार्मिक पुजेच्या सोहळ्या दरम्यान श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले आदीसह मंदीर कर्मचारी, सेवेदारी वर्ग उपस्थित होती.
संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे मोजक्याच पुजारी बांधवाच्या उपस्थित शारदीय नवराञ महोत्सवाच्या धार्मिक सोहळ्याची नित्योपचार पुजा सकाळी व संध्याकाळी करण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळी प्रक्षाळ पुजेस प्रारंभ होवून श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारात पाचव्या माळेचा छबिना काढण्यात आला.
श्री देवीच्या दरबारात प्रत्येक वर्षी शारदीय नवराञ महोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा माञ शारदीय नवराञ महोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. तरी देखील श्री देवी भक्त आँनलाईन दर्शनाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत.