अणदूर, दि. 15 : "वाढदिवस हे निमित्य असते, त्या निमित्य सामाजिक उपक्रम हाती घेऊन ते राबविणे तेही मित्रमंडळी कडून ही खूप चांगली गोष्ट असून, आशा वाढदिवसाचा आदर्श घेऊन समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची गरज आहे."असे प्रतिपादन अणदूर जि. प. सदस्य बाबुराव चव्हाण यांनी केले आहे.

ते अणदूर येथील पत्रकार अजय अणदूरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जयमल्हार पत्रकार संघ अणदूर व 8 फार्मा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेतील 1ली ते 4ती वर्गातील128 विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तकाचे वाटप व 2 सप्तपर्णी झाडाचे ट्री गार्ड सह वृक्षारोपण कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. 

कार्यक्रमास श्री श्री रविशंकर विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे, डॉ नागनाथ कुंभार, महादेवप्पा नरे, शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष बाबुराव मुळे, शाळेचे मुख्याध्यापक गोविंद पवार, कन्या शाळेचे मुख्याध्यापक यशवंत मोकाशे, शिक्षक नेते अविनाश मोकाशे, ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण, बालाजी मोकाशे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी डॉ जितेंद्र कानडे म्हणाले की, "समाजाचं आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने मित्रांनी अशा सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरे करणे ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे या स्वाध्याय पुस्तकांचा वापर शाळेत न येता विद्यार्थ्यांना अभ्यास करायला खूप उपयुक्त आहे.

या वेळी डॉ नागनाथ कुंभार, महादेवप्पा नरे गुरुजी, पत्रकार अजय अणदूरकर यांची भाषणे झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार दयानंद काळुंके यांनी केले तर सूत्रसंचालन यशवंत मोकाशे सर यांनी केले, कार्यक्रमास गोविंद शिंदे, संजय जाधव, जीवन मोजगे, महेश कार्ले,राजेश देवसिंगकर, शाहूंराज मोकाशे, म्हाळू घोडके, संतोष कस्तुरे, मधुकर बंदपट्टे, पत्रकार,शिक्षक, शिक्षिका, फार्मा ग्रुप सदस्य उपस्थित होते, कार्यक्रमाचे आभार बाबुराव जवळगे यांनी मानले.

 
Top