तुळजापूर : कुमार नाईकवाडी
शहरातील जिजामाता नगर येथील हनुमंत दाभाडे व मैनाबाई विनायक पोद्दार यांच्यासह अन्य दोघांच्या घराचे मुसळधार पावसाने पडझड झाले आहे. त्यामुळे आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज युवा प्रकोष्ठ यांच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर शहरातील जिजामाता नगर येथील अत्यंत गरीब कुटुंबातील ज्यांचे हातावर पोट आहे अशा कुटुंबांचे कालपासून मुसळधार पावसाने त्यांचे घर पडले आहे. त्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. तरी या कुटुंबांचे हातावरचे पोट असून त्यांच्या उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना तात्काळ मुख्यमंत्री सहायता निधी मधून त्या कुटुंबांना आर्थिक मदत करावी व जीवन सुरळीत होईपर्यंत भोजनाची मोफत सोय करावी, अशी मागणी हिंदू खाटीक समाज युवा प्रकोष्ठच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदनावर युवा प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष दिनेश पलंगे, विजय भोसले, मंथन रांजणकर, अजिंक्य हंगरगेकर, शुभम भिसे, बाळासाहेब भिसे, किरण जाधव यांच्या स्वाक्ष-या आहेत.
