तुळजापूर : कुमार नाईकवाडी
संसर्गजन्य कोरोनामुळे तब्बल ७ ते ८ महिन्यापासून श्री तुळजाभवानी मंदीर असल्याने सर्व व्यवसाय ठप्प आहेत. अन् त्यातच बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे श्री तुळजाभवानी मंदीराच्या मागील बाजूच्या असलेल्या अनेक घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे पडझड झालेल्या घरांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी तुळजापुर तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बुधवार दि. १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे श्री तुळजाभवानी मंदीराच्या मागील बाजूस असलेल्या आराधवाडी तसेच भिमनगर परीसरातील आदेश रोकडे, दत्ता गायकवाड यांचे घर कोसळून त्यांची पत्नी, लहान मुली-मुले असे आठजण गंभीर जखमी झाले. तसेच भिमनगर येथिल मालाबाई कदम, मोहन कदम, मुरलीधर सोनवणे, गोपाळ सोनवणे, करूणा रविंद्र कदम, सुरेखा बाळू कदम, जया ढावरे, योगेश सोनवणे यांच्यासह इतर काही जणांचे घर कोसळून घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे.
सदरील कूटूंब हे आर्थिकदृष्ट्या मागास तसेच अत्यंत गरीब आहेत. सदर घटनेचा तातडीने पंचनामा करुन या कूटूंबांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी. जर शासनाने वरिल घटनेची गंभीर दखल घेतली नाहीतर या कूटूवांबर आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय नसुन कुटूंबाला न्याय नाही मिळाल्यास कुटूंबासहित उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर येथिल युवक सागर कदम, किरण कदम, अभिजीत काळे, मुरलीधर सोनवणे, प्रितम सोनवणे, मालाबाई कदम, मोहन कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
