उस्मानाबाद, दि. 15 : उस्मानाबाद  जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून अतिवृष्टी पावसामुळे अतोनात पिकांचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशीही संवाद साधला. 

यावेळी खासदार निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना धीर देत जिल्हा प्रशासनाला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे सरकट पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. शेतकऱ्यांना शासनाकडून व विमा कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई वेळेतच कशी मिळेल या बाबत दक्षता घेण्याचे निर्देश खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिले.  यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, शेतकरी उपस्थित होते.

(छाया - राहुल कोरे आळणीकर )

 
Top