✏   तुळजापूर लाईव्ह | सकाळच्या टॉप हेडलाईन्स |  दि. 11 ऑक्टोबर 2020

🎯  *ताज्या अपडेटसाठी लॉग ईन करा -* www.tuljapurlive.in

----------------------------------------------------  

✍🏻  *संकलन :- विकास नाईक 📱 8668973422*

---------------------------------------------------- 

उस्मानाबाद : जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान; पपई, ऊस भुईसपाट, पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी, शेतकरी पुन्हा अडचणीत...

तुळजापूर : येथील भूम अभिलेख कार्यालयातील सहाय्यक उपअधिक्षकाची बॅग चोरट्यांनी केली लंपास...

उस्मानाबाद : तालुक्यातील चिखलीचे सुपुत्र, बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रामेश्वर मोहिते (वय 28) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू...

उस्मानाबाद : चोरट्यांनी फोडली सात दुकाने, मात्र सहा दुकानात काही हाती न लागल्याने सातव्या दुकानातील चप्पल व बुटाचे दीडशे नग केले लंपास; करजखेडा चौरस्त्यावरील घटना....

भूम : तालुक्यातील आंबी येथील आलियाबादवाडी शिवारात वीज कोसळून 65 वर्षीय महिलेचा मृत्यू...

वाशी : येथील भैरवनाथ-शिवशक्ती साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा चेअरमन प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला...

सोलापूर : सोलापूरच्या जेष्ठ लेखिका निर्मला मठपती यांचे निधन...

नाशिक : अध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे मंगळवार दि. १३ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी उपोषण; मंदिरे खुली करावीत, यासाठी होणाऱ्या या उपोषणास भाजपचा पाठिंबा, या उपोषण आंदोलनाचे केंद्र शिर्डी असणार...

राज्यात शनिवारी ३०८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. दिवसभरात ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान तर तब्बल २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन परतले घरी. राज्यातील रिकव्हरी रेट पोहचला ८२.७६ टक्क्यांवर...

गोव्यातील बागा बीचवरील एका हॉटेलमधुन आयपीएलबर सट्टेबाजी; 5 जणांना अटक तर अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त...

तिहेरी तलाकसाठी लढा देणारी शयारा बानो हिने देहरादूनमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला...

----------------------------------------------------------

🌀 आपणही आम्हाला बातम्या पाठवू शकता. व्हाटसअप नंबर 📱 8668973422

🌐 फेसबुक पेज लाईक करा - https://www.facebook.com/livetuljapur

-----------------------------------------------------------

 
Top