जळकोट : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील लोहगावसह परिसरात पशुवैद्यकीय विभागाकडून जनावरांना रोग प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. 

गेल्या पंधरा दिवसापूर्वी   जनावरांनासाठी घातक असलेल्या  लंपी साथरोगाने अनेक जनावरे बाधित झाली होती. यामुळे पशुपालक शेतकरी हैराण झाले होते. तसेच रोग संसर्गजन्य असल्याने याचा फैलाव परीसरात  होवू नये. यासाठी  लोहगाव ग्रामपंचायतचे सदस्य निजाम शेख यांनी पशुवैधकीय विभागाकडे लोहगावसह परीसरात जनावरांसाठी  रोग  प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम तात्काळ राबवण्याची  मागणी निवेदनाद्वारे केली होती.

याची  पशुवैद्यकीय विभागाकडून तात्काळ दखल घेण्यात आली व लोहगावसह परीसरातील   जनावरांसाठी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली. यासाठी नळदुर्ग पशुवैद्यकीय दवाखान्याचे  पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस.एल. भातलवंडे, सुभान शेख, मदन मोरे, सुरज लोंढे आदीजण परिश्रम घेत आहेत.

पहिल्याच दिवशी  लोहगाव येथील २९३ जनावरांना लस देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख, रविंद्र दबडे, राम कांबळे, संदिपान दबडे, हणमंत लांडगे, वाल्मिक पांढरे सह आदी पशुपालक, शेतकरी, नागरिक उपस्थित होते.

 
Top