नळदुर्ग : एस.के. गायकवाड  

रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले)च्या तुळजापूर तालुक्यातील नुतन पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

 दि. ३ ऑक्टोबर रोजी रिपाइंच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओव्हळ यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर येथे रिपाइंचे जिल्हा आधिवेशन घेण्यात आले होते. या आधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होऊन तुळजापूर तालुक्यातील काही नुतन पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्याआहेत. त्या पुढील प्रमाणे रिपाइं तालुका कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के, तालुका सरचिटणीस केतन ऊर्फ मुन्ना कदम ,तालुका उपाध्यक्ष विष्णु सोनवणे,रिपाइं युवा आघाडी तालुका अध्यक्ष प्रदिप सिरसाट, तालुका युवा सरचिटणीस सुभम कदम,युवा उपाध्यक्ष सुनील बनसोडे,रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परीषद ,(विद्यार्थी आघाडी) तालुका सरचिटणीस प्रशिक बनसोडे, तुळजापूर शहराध्यक्ष राजपाल कदम,शहर उपाध्यक्ष प्रथ्वीराज कदम,आदींची निवड जाहीर करण्यात आली.

 सर्व नुतन पदाधिकारी यांचे रिपाइंचे मराठवाडा उपाध्यक्ष आनंद पांडागळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम, तुळजापूर शहराध्यक्ष   अरूण कदम, युवा जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे, नळदुर्ग शहराध्यक्ष दत्ता बनसोडे,युवा तालुका सचिव सागर सुरवसे सह मित्र परिवारानी आभिनंदन केले आहे.

 
Top