नळदुर्ग, दि. 29 : अर्भकाच्या पालनपोषणाची जबाबदारी टाळण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने नुकत्याच जन्मलेल्या पुरुष जातीच्या अर्भकास बाभळगांव येथील पुलाखालील रस्त्याच्या बाजूस दि. 28.10.202 रोजी 15.00 वा. सु. त्या अर्भकास उघड्यावर सोडले होते. अशा मजकुराच्या नळदुर्ग पो.ठा. च्या महिला पोलीस- सुवर्णा गिरी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 317 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवार दि. 28 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फुलवाडी ता. तुळजापुर येथील टोल नाका या ठिकाणी पेट्रोलींग करत असताना बालाजी हिप्परगे ड्रायव्हरचे लक्ष्य फेकलेल्या नवजात बाळाकडे गेले. सदरील बाळ हे पिशावीत होते. या पिशवीतुन रडण्याचा आवाज येत असल्याने सदरील पिशवी उघडुन पाहिली असता या पिशवीत नुकतेच जन्मलेले बाळ आढळुन आले. या बाबत तात्काळ नळदुर्ग पोलीस स्टेशनला घटनेची माहिती देण्यात आली. काही वेळात नळदुर्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी पिशवी पाहिली असता सदरील बाळ हे जखमी अवस्थेत होते. भुकेने रडत असल्यामुळे महिला पोलीस कर्मचारी यांनी स्वःताचे दूध पाजले. या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे मातृत्व जागे झाले रडणारे बाळ पाहुन मन हेलावले म्हणुन या महिला कर्मचारी यांनी स्वःताचे दुध पाजुन मातृ धर्म निभावला त्यामुळे बाळाचे प्राण वाचवले.