तुळजापूर, दि. 9 : येथील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 मध्ये मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी स्वखर्चातून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका  विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले. तसेच शासनामार्फत प्राप्त शालेय पोषण आहार वाटप करण्यात आले.

नगराध्यक्ष सचिन  रोचकरी, शिक्षण सभापती मंजुषा देशमाने, नगरसेवक विजय कंदले, नगरसेवक नानासाहेब लोंढे, नगरसेवक अभिजित कदम, पालक समितीचे अध्यक्ष राजेंद्र सातपुते, काशिनाथ सोमोसे, आनंद  कंदले, मुख्याध्यापक बाळासाहेब जेटीथोर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष रोचकरी यांनी सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना, शिक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन लॉकडाऊन मुळे शाळा बंद जरी  असली तरी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी दिलेल्या स्वाध्याय पुस्तकाच्या माध्यमातून नियमीत घरी अभ्यास करावा असे सांगितले. तर अभिजित कदम यांनीही मार्गदर्शन केले.

 प्रस्ताविक सहशिक्षक एम बी पाटील, सूत्रसंचालन महेंद्र कावरे यांनी तर आभार  रोचकरी गणेश यांनी मानले.   यावेळी सहशिक्षक सुरजमल शेटे, यादव एस.बी., श्रीमती लोहारे के.ए., एस.बी. गिराम, एम बी रोचकरी आदीजण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी डाके, बेबी गाडे, सिंधू देशमुख, शालन माने यांनी पुढाकार घेतला.

 
Top