उस्मानाबाद, दि. 04 : उस्मानाबाद जिल्हयात आज बुधवार दि. 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 51 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तसेच आज दिवसभरात 27 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 14 हजार 893 इतकी झाली आहे. यातील 13 हजार 772 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 538 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 583 जणांवर उपचार सुरु आहेत.