तुळजापूर : कुमार नाईकवाडी

येथील ह.भ.प. चंद्रहार मारुतीराव इंगळे गुरुजी यांची स्वरचित अभंगवाणी नुकतेच लातूर येथे सहा अध्यक्ष विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ट्रस्ट श्रीक्षेत्र पंढरपूरचे  ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभ हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी महंत स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ औसाचे सचिव गिरीश पाटील, अभंगवाणीचे संपादक प्रा.  नितीन कुंभार, शिवशंकर जळकोटे आदीजण उपस्थित होते. सदरील अभंगवाणी इंगळे गुरुजींनी गुरु कृपेच्या बळावर लिहिलेली असून ही प्रासादिक अभंगवाणी आहे. या अभंगवाण ला प्रस्तावना नाथ संस्थान औसाचे हभप गहिनीनाथ महाराजांची लाभली असून याचे संपादन प्राध्यापक नितीन कुंभार व शिवशंकर जळकोटे  या इंगळे गुरुजींच्या शिष्यांकडून झाले आहे. लातूर या ठिकाणी गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते अत्यंत भक्तीमय वातावरणात या अभंगवाणी चे प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला.


 
Top