नळदुर्ग, दि. 21 : जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन नळदुर्ग पो.ठा. पथकाने नळदुर्ग येथे दि. 20.11.2020 रोजी 14.30 वा. सु. छापा टाकला. यावेळी 1)अविनाश बनसोडे 2)किरण कांबळे 3)धनराज वाघमारे 4)अमोल जाधव, सर्व रा. बौध्दनगर, तुळजापूर हे सर्वजण संगणक मटका जुगार खेळतांना जुगार साहित्य व 3,600 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन म.जु.का. कलम- 12 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.