तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
मागील महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले होते.या नुकसानीची प्रशासनाच्या वतीने पहाणी करण्यात येऊन जिरायत शेतीसाठी हेक्टरी दहा हजार व फळबाग नुकसान भरपाईसाठी हेक्टरी २५ हजार मदत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केली होती.परंतु तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी व परीसरातील शेतकर्यांच्या खात्यावर तोकडी मदत जमा होत असुन यामध्येही अनेक शेतकरी मदतीपासुन वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे.
ऑक्टोबर महिन्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यासह तुळजापूर तालुक्यात तसेच तामलवाडी परीसरात अतीमुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने नदी, नाले तुडुंब भरल्याने अनेक गावात ओढ्याचे पाणी घुसले, अनेक घरांची पडझडही झाली. यामध्ये जगाचा पोशिंदा शेतकरी राजांचे अतोनात नुकसान झाले.पिके तर वाहुन गेलीच परंतु शेतातील माती ही वाहुन गेल्याने शेतकरी हतबल झाला.या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी सत्ताधारी मंत्री विरोधी पक्षांचे नेते,यानी पहाणी केली.
या पहाणी नंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिरायत शेतीसाठी हेक्टरी १० हजार व फळबाग नुकसानभरपाई करीता हेक्टरी २५ हजार रुपये मदत जाहीर करून दिवाळी गोड करण्याचे जाहीर केले.त्याप्रमाणे दिवाळीनंतर तामलवाडी व परीसरातील शेतकर्यांच्या खात्यावर मदत जमा होऊ लागली. परंतु काही कोरडवाहू शेतकर्यांच्या खात्यावर २ हजार ५०० ते ४ हजार रुपये तर फळबाग नुकसानभरपाई १० हजार रुपये प्रमाणे जमा होत असल्याने ही मदत अतिशय तोकडी असल्याने शेतकरी वर्गातुन संताप व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे. तर अनेक शेतकर्यांच्या खात्यावर मदत जमा झाली नसल्याने शेतकरी या मदतीपासुन वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकरी वर्गातुन संताप व्यक्त होत असुन शासन शेतकर्यांची थट्टा करत असल्याचे शेतक-यांनी बोलताना सांगितले.
शेतक-यांनी बॅंकेचे खातेनंबर लवकर द्यावेत
अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोना नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या खात्यावर तोकडी नुकसान भरपाई जमा होत असुन या मदतीपासुन अनेक शेतकरी वंचित राहत असुन या शेतकर्यांचे बॅंक खातेनंबर नसल्याने ते मदतीपासुन वंचित राहत असल्याचे तलाठी यांनी सांगितले. मदत जमा न झालेल्या शेतकर्यांनी लवकरात लवकर बॅंक खातेनंबर द्यावेत असे तलाठी यांनी सांगितले आहे.
दोन टप्प्यात नुकसानभरपाई मिळणार
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची मदत जमा होत असुन ही मदत अतिशय तोकडी असल्याने शेतकर्यांमधुन संताप व्यक्त होत असुन ही मदत दोन टप्प्यात मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दुसर्या टप्प्यात मदत मिळणार की यावरच समाधान मानावे लागणार?असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.