उस्मानाबाद, दि. 24 : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 1 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास राज्य मंत्री अब्दुल सत्तार, खा.ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री बसवराज पाटील, मा.खा.रवींद्र गायकवाड यांच्या विशेष उपस्थितीत उस्मानाबाद येथील तेरणा कॉलेज समोरील शुभ मंगल कार्यालयात गुरुवारी (दि.26) सकाळी 10:10 वा. पदवीधर व कार्यकर्ता जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 

यावेळी आ.विक्रम काळे, आ.ज्ञानराज चौगुले, आ.कैलास पाटील, आ.तानाजी सावंत, मा.आ.राहुल मोटे, मा.आ.सिद्रामअप्पा आलूरे गुरुजी, मा.आ.नरेंद्र बोरगावकर, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, जीवनराव गोरे, सुरेशराव बिराजदार, ऍड.धीरज पाटील, गौतम लटके, भाई धनंजय पाटील, संजय निबाळकर, सक्षणा सलग तसेच उस्मानाबाद जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, नगरसेवक, जि. प.सदस्य, पं. स.सदस्य, व सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सदरील मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन उस्मानाबाद जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी सतीश चव्हाण यांच्या कामाची प्रशंसा करत त्यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ मराठवाड्यातील महाविकास आघाडीचे सर्वच नेते, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून मराठवाड्यातील आठही जिल्हयात विविध ठिकाणी पदवीधर मेळावे, पदवीधर मतदारांच्या गाठी भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत. 

 
Top