उस्मानाबाद, दि. 30 : 05-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक करीता मतदान दिनांक 01 डिसेंबर 2020 रोजी होणार असून सदर मतदानासाठी पदवीधर असलेले व ज्यांनी नाव नोंदणी केलेली आहे अशा मतदाराना त्यांचे मतदान यादी मधील त्याचे नाव व मतदान केंद्राचे ठिकाण याची माहिती उपलब्ध होण्यासाठी मा. मुख्य निवडणूक कार्यालय मुंबई यांचे मार्फत http:103.23.150.139/GTsearch2020/ सुधारित लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.05 औरंगाबाद पदवीधर मतदानासाठी पदवीधर असलेले व ज्यांनी नाव नोंदणी केलेली आहे अशा मतदारांनी त्यांचे मतदान यादी मधील नाव व मतदान केंद्राचे ठिकाण यांची माहिती उपलब्ध होण्यासाठी http:103.23.150.139/GTsearch2020 ही सुधारीत लिंकचा वापर करावा,असे आवाहन मा.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 05 औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ तथा जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी केले आहे.