उस्मानाबाद, दि. 30 : 05-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 साठी उस्मानाबाद जिल्हयातील निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून मतदानाच्या एक दिवस आधी जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा व पोलीसांचा ताफा आपआपल्या मतदान केंद्रावर रूजू होण्यासाठी निघाले आहे.
आज सकाळ पासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परीसरात मतदान केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी, आणि पोलीस बंदोबस्तांतील अधिकारी व कर्मचारी यांच्या येण्यास सुरूवात झाली होती.74 मतदान केंद्रावर 99 केंद्राध्यक्ष, 300 मतदान अधिकारी,व 508 पोलीस आणि इतर 650 कर्मचारी नेमून दिलेल्या वाहनातून आज रात्री आपआपल्या मतदान केंद्रावर पोहचतील. या निवडणूक प्रक्रियेत 42 क्षेत्रिय व 27 नोडल अधिकारी,यांच्या सेाबत प्रत्येक मतदान केंद्रावर नेमून दिलेले सुक्ष्म निरीक्षक मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधान परिषद व्दिवार्षीक निवडणूक 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या कार्यक्रमानुसार दिनांक 01 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 08.00 ते सांयकाळी 5.00 वाजे पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील एकुण 74 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
प्रत्येक मतदान केंद्रासाठी 4 पोलीस कर्मचारी/होमगार्डस् यांची नियुक्ती करण्यात आलेली असून एक पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या इमारतीसाठी अतिरीक्त पोलीस कुमक बंदोबस्तात राहणार तसेच 30नोव्हेंबर व 1 डिसेंबर या रोजी विशेष पोलीस सेक्टर पेट्रोलींग चे नियोजन करण्यात आले आहे. मतदान केंद्रा पासून 100 मि. व 200 मि. वर चूना फक्कीने मार्कींग करण्यात आली आहे या हद्दिमध्ये प्रचार करण्यास निर्बंध आणि मतदान केंद्रावर मोबाईल /कॅमेरा इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हयाच्या संपूर्ण मतदान प्रक्रियेवर जिल्हाधिकारी कार्यालयातील Control Room मधून सनियंत्रण ठेवण्यात येणार .सर्व मतदान केंद्राच्या Web Casting ची निरिक्षण व नियंत्रण ,निवडणूक प्रक्रिये दरम्यान वापरणात येणा-या सर्व वाहनांचे GPS Tracking ,निवडणूक विषयक सर्व अहवाल संकलन यंत्रणा कार्यन्वीत असेल. तसेच जिल्हास्तरीय कंट्रोल रुम मधून सर्व 74 मतदान केंद्रावर बारकाईने लक्ष ठेवला जाईल व मतदान केंद्रावर डीओग्राफरची नेमणूक व पूर्ण मतदान प्रक्रीयेची Live Webcasting केली जाणार. मतदान पथकाची मतपेटयासह वाहतूक करणा-या 74 वाहनांची आणि 27 क्षेत्रिय अधिकारी यांचे वाहनांची जिल्हास्तरावरील Control Room मधून GPS Tracking केले जाईल. तसेच सर्व मतदान केंद्रासाठी मतदार सहाय्यता कक्ष BLO (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) नेमणूक करण्यात आली असून मतदारांना मतदार यादीतील नावाची पडताळणी करण्यात मदत करतील. यावेळी सर्व केंद्राध्यक्षानी मतपेटया मतदान पत्रिका आणि मतदानाचे इतर साहित्य तपासून घेतले.