होर्टी, दि. 19 : तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथे बुधवार दि.१८ नोव्हेंबर रोजी टायगर ग्रुपचे अध्यक्ष पै. तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप होर्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदरील रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर शिबीरासाठी छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालय येथील रक्तपेढीचे सहाय्य लाभले. यावेळी चैतन्य सगर, अभिषेक मुर्टे, राम कदम, भिमाशंकर वर्दे, नेताजी भोसले, पप्पू सगर, चैतन्य राजमाने, मछिंद्र सराटे, श्रीपती बोधे, अंकुश भोसले, शकील शेख, ऋशिकेष गाडे, पृथ्वीराज तुगावे, अक्षय भोसले, सोमनाथ सराटे, पद्माकर भोसले, सोपान मुळे, अशितोष वाघमारे, क्रांती भोसले आदिजण उपस्थित होते.

 
Top