नळदुर्ग, दि. 18 : तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजास केंद्र सरकारने आदिवासी संवर्गात समाविष्ट करावेत अन्यथा राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती आमदार राजेश राठोड यांनी केली. 

तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी आ. राजेश राठोड हे बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण हे उपस्थित होते. यावेळी विधान परिषद सदस्य म्हणून आमदार राजेश राठोड यांची निवड झाल्याबद्दल, तसेच महाराष्ट्र आश्रम शाळा संघाचे अध्यक्ष म्हणून रामदास चव्हाण यांची तर सेवानिवृत्त झाल्या बद्दल आरोग्य कर्मचारी गणेश होबा राठोड यांचा सत्कार करण्यात आला. 

तर कु.सोनाली गोविंद चव्हाण (आलियाबाद,,)ही मेडिकल प्रवेशासाठी पात्र ठरल्याने तर एस.एस.सी.परिक्षेत कु.सुयोग शिवाजी राठोड (आलियाबाद) ९८% गुण,कु.रिया सुभाष चव्हाण (आलियाबाद) ९७% गुण,कु.प्रतिक्षा अनिल राठोड (बोरमन तांडा) ८३% कु.करिशमा महादेव चव्हाण ( रामतीर्थ)८२% कु.आर्यन प्रकाश चव्हाण (आलियाबाद)८१% कु.आदित्य रमेश राठोड ,वडाचा (तांडा)८२% कु.करिश्मा जाधव (जखंणी तांडा)७९% आकाश राठोड (गंधोरा तांडा)७५% अमित विनायक राठोड रामतीर्थ ७४% ओम सुनील चव्हाण आलियाबाद ७३%, इंग्रजी माध्यमात प्राथमिक मध्ये कु. मनस्वी सुनील चव्हाण ९९ %गुण घेऊन प्राविण्य मिळवलेल्या ‌सर्व गुणंवत विद्यार्थीयाचे सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिठाराम राठोड लातूर , मांजरा साखर कारखान्याचे संचालक बाबुराव जाधव, गुलाब जाधव, राजाभाऊ शेरखाने, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रकाश राठोड, अशोक पाटील, सिद्रामप्पा मुळे , दिलीप सोमवंशी, डॉ.सुरज चव्हाण, माजी सभापती प्रदिप राठोड रेणापूर, योगेश राठोड, बंजारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, उपाध्यक्ष हरीष जाधव, वैभव जाधव, संजय राठोड, लक्ष्मण राठोड ,अमृता चव्हाण, माणिकराव चव्हाण,नेमिनाथ चव्हाण, नामदेव नाईक , शिवाजी चव्हाण पोलीस पाटील ,डॉ वाय. के.चव्हाण , बाबुराव पवार, महादेव राठोड, बाबुराव चव्हाण, गोविंद पवार, विनायक चव्हाण, थावरु राठोड ,ताराचंद राठोड, सिताराम राठोड , रामचंद्र पवार शिवाजी राठोड ,श्रीमंत राठोड, संजय पवार,संजय चव्हाण, राजेंद्र राठोड, प्रवीण चव्हाण, शंकर राठोड, सुभाष चव्हाण, शिवाजी चव्हाण, गोविंद राठोड, शंकर चव्हाण, व्यकंट राठोड,बाबु जाधव, गोविंद जाधव आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी नाईक यांनी केले  आभार अशोक चव्हाण यांनी मानले.

 
Top