नळदुर्ग, दि. 19 : वात्सल्य संस्थेच्या माध्यमातून वागदरी ता. तुळजापूर येथील सदगुरू भगवानसिंग महाराज भजनी मंडळास टाळ,मृदंग,व हार्मोनियम घेण्यासाठी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

वागदरी हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. गावांमध्ये नित्यनियमाने भजन,आरती,पारायण सोहळा,भागवत सप्ताह,याचे आयोजन केले जाते.भजनी मंडळाने केलेल्या आवाहनानुसार वात्सल्य सामाजिक संस्थेने भजनी मंडळास साहित्य घेण्यासाठी मदत केली.

वात्सल्य संस्थेने यापूर्वीही गावातून वाहणाऱ्या बोरी नदीचे खोलीकरण,भवानसिंग महाराज मंदिराच्या घाटावरील पाय-यांचे बांधकाम,कोरोना काळात  गरजवंत कुटुंबांना धान्य वाटपाची मदत केली आहे.

यावेळी वात्सल्य संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. प्रणिता शेटकार, उपाध्यक्षा श्रीमती.प्रमिला जाधव, विश्वस्त श्रीमती राधा माने, भजनी मंडळाचे अध्यक्ष सुरेश परिहार, राम यादव, अ.भा. वारकरी मंडळाचे पदाधिकारी राजकुमार पाटील, माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष फत्तेसिंग ठाकुर व गावकरी उपस्थित होते.

 
Top