नळदुर्ग : एस.के. गायकवाड
बदलत्या काळात ऑनलाईन शैक्षणिक धोरण उदयास येत आहे. परंतु एस.सी./एस.टी./व ओबीसी गरीब मगासवर्गीय विद्यार्थ्यांकडे मोबाईल किंवा लॅपटॉपसारखे साधन नसतात. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तेंव्हा राज्य शासन व केंद्र शासनाने मागासवर्गीय गरीब इ.९वी ते १२वी शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप व संगणक संच मोफत वाटप करुन दरवर्षी नेट बँलेन्स भरण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांनी तुळजापूर येथे आयोजित एका बैठकीत केली.
तुळजापूर येथे रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हळ यांच्या अध्यक्षतेखाली रिपाइं कार्यकर्त्यांची पक्ष बांधणी या विषयी एक विचार मंथन बैठक संपन्न झाली. यावेळी राजाभाऊ ओव्हाळ हे बोलत होते. याप्रसंगी उमरगा तालुक्यातील कार्यकर्ते गौतम कांबळे, किसन जाधव, शहुराज गायकवाड, बालाजी गायकवाड, महिला कार्यकर्त्या छायबाई एकीले सह कार्यकर्त्यांनी ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली रिपाइं मध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, जिल्हा सचिव एस.के..गायकवाड, युवा अघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे, तुळजापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, तालुका कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के, तु्ळजापुर शहराध्यक्ष अरुण कदम, तालुका सरचिटणीस केतन कदम, तालुका युवा अघाडी सरचिटणीस शुभम कदम, प्रा. प्रियदर्शी कांबळे, आतिष कदम, राजपाल कदम, पवन कदम, अरविंद लोखंडे, पत्रकार दिलीप सुरवसे, पंचशीला कांबळे, महिला कार्यकर्त्यां आशाताई कांबळे, रेखा राऊत, अंबिका दळगडे, शशिकला शनमा यांच्यासह रिपाइंचे कार्यकर्ते उपस्थित होते.