नळदुर्ग, दि. 26 : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये गुरुवार दि. 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला.

प्रांरभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास लहाने, वैद्यकीय शिक्षणासाठी (एमबीबीएस) निवड झालेल्या गणेश भुजबळ, पत्रकार विलास येडगे यांचा शाळेच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

या कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष मारुती खारवे, निवृत्त शिक्षक शिवाजीराव व-हाडे, भाजपाचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके, पत्रकार सुहास येडगे, तानाजी जाधव, उत्तम बनजगोळे, शिवाजी नाईक, अमर भाळे, एस.के. गायकवाड यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक एस.के. गायकवाड यांनी केले. तर आभार शिक्षक मधुकर जायभाय यांनी मानले.

 
Top