उस्मानाबाद, दि. 26 : विजबिल माफ करावे व महिला बचत गटाचे कर्ज माफ करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संविधान दिनाच्या दिवशी संविधान वाचून व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मनसेच्या मोर्चाची सुरवात करण्यात आली.

मोर्चाचे नेतृत्व मनसेचे सरचिटणीस, सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष मा.दिलीप (बापू) धोत्रे यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी प्रचंड घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा पुढी जात असताना पोलिसांनी विनंती केली की मोर्चा येथेच संपवा व निवेदन देण्यासाठी महत्त्वाचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन देण्यात यावे. 

पोलीस प्रशासनचा मान ठेवून तिथेच ठिया बैठक झाली. दिलीप बापू धोत्रे यांनी मोर्चास आलेल्या कार्यकत्यास व महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा संघटक अमरराजे कदम, जिल्हा अध्यक्ष प्रशांत नवगिरे, जिल्हा अध्यक्ष आबासाहेब ढवळे, राजेंद्र गपाट, जिल्हा सचिव दादा कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश साळुंके, तालुका अध्यक्ष सागर बारकुल, तालुका अध्यक्ष अतुल जाधव, पाशाभाई शेख यांच्यासह कार्यकर्ते, महिला  उपस्थित होते.

 
Top