जळकोट : मेघराज किलजे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिंदगाव येथे भारतीय संविधान दिन फिजिकल डिस्टन्स ठेऊन साजरा करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधानाची प्रत संविधान सभेला सुपूर्द करत असतानाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर श्री.डी. एम.   कुडकले   यांनी संविधान निर्मिती व भारताच्या जडणघडणीत संविधानाचे योगदान या विषयावर मनोगत व्यक्त केले.त्यानंतर संविधान दिनाच्या निमित्ताने शाळेचा माजी विद्यार्थी प्रबुद्धभूषण शिंदे यांनी संविधानाची प्रत शाळेस भेट दिली. कार्यक्रमासाठी मु.अ.श्री.बलसुरे एस.व्ही.,श्री.राठोड पी.आर.,श्री.कुडकले डी.एम.,श्री.खटके आर.डी.,श्री.कंदले ए.बी.,श्रीम.बटगेरी ए.पी.व पालक चंद्रकांत शिंदे उपस्थित होते.

लोहगाव येथे संविधान दिन 

लोहगाव येथील भिमनगर मधील जेतवन बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे तसेच संविधानाचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख, ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा गायकवाड, परमेश्वर लोखंडे, सुरज कांबळे, अतुल लोखंडे, प्रवीण बागडे, विशाल बागडे आदीजण उपस्थित होते.

 
Top