चिवरी : राजगुरु साखरे

तुळजापूर तालुक्यातील उमरगा (चिवरी) येथे आवास दिनानिमित्त रमाई आवास योजनेतून पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना तुळजापूर पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांच्या हस्ते घरकुलाचा ताबा व गृह प्रवेश देण्यात आला व नवीन मंजूर लाभार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला, बांधकाम लवकर पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बांधकाम पुर्ण झालेल्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी विस्ताराधिकारी के.बी .भांगे, कनिष्ठ अभियंता अमित कांबळे, ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, पोलीस पाटील महेश पाटील आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top