जळकोट : मेघराज किलजे
देशातील नागरिकांमध्ये स्वच्छता व आरोग्यबाबत जागृकता निर्माण व्हावी. या उद्देशाने सीवायडीए संस्था, पुणे व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्रातील विविध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक शौचालय दिनानिमित्त महाराष्ट्रातील ठिकाणी ई- मॅरेथॉनचे दि.१५ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या ई- मॅरेथॉनचा दि.१९ रोजी जळकोट (ता. तुळजापूर) येथे समारंभ पार पडला.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जागतिक शौचालय दिनानिमित्त या खास ई- मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र व राज्य सरकार स्वच्छता व आरोग्य बाबत सतत प्रयत्नशील आहे. स्वच्छता व आरोग्यबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण होऊन भविष्यात आरोग्याबाबत प्रश्न भेडसावू नयेत. यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात या मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जळकोट येथील मुंबई- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर या मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला. अनेक युवकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. जळकोट येथील आलियाबाद फाट्यावर या मॅरेथॉनचे उद्घाटन नळदुर्ग पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास लहाने व माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सीवायडीए संस्था, पुणे या संस्थेचे समन्वयक युवराज बनसोडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष अरुण लोखंडे, श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार मेघराज किलजे,ऍड. आशीष सोनटक्के, रोहित कदम आदीजण उपस्थित होते. या मॅरेथॉनमध्ये ज्ञानेश्वर मोरे, भरत पाटील, मनोज जाधव, गोविंद बेडगे, महेश सुरवसे, मारुती पाटील, हनुमंत जाधव, आकाश खुने, ज्ञानेश्वर बंडगर, आकाश सोनटक्के ,ओंकार दरेकर, कलीम जमादार, गणेश लोखंडे, प्रदीप लोखंडे, राजेश लोखंडे, अजय लोखंडे, अरविंद लोखंडे, ओंकार भालेराव, मल्हारी लोंढे,, कमलाकर लोखंडे, शाहूराज बनसोडे, नितीन लोखंडे, विकी बेडगे आदि युवक, नागरिक, संस्थेचे पदाधिकारी, पत्रकार संघाचे सदस्य यांनी सहभाग नोंदवला.