नळदुर्ग, दि. 09 : मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांना पक्षाकडून उमेदवारी द्यावी, अशी मागणी तुळजापूर, लोहारा, उमरगा तालुक्यातील पदाधिका-यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे  केली आहे.  

महाविद्यालयीन जीवनापासून राजकीय, सामाजिक कार्यात सक्रिय असलेले प्रशांत नवगिरे यांचे विद्यार्थी, पदवीधर, तसेच विविध राजकीय व सामाजिक संघटनेच्या नेत्यांसोबत, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. पक्षाच्या  एस.टी. कामगार सेनेच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यात त्यांनी विविध आंदोलने केली आहेत.मराठवाड्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. अनेक कर्मचारी, विद्यार्थी, तरुण व नागरिकांपर्यंत त्यांचे कार्य पोहचले आहे. अनेक आंदोलने, मोर्चे, यशस्वी रीतीने पार पाडून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सतत  प्रयत्नशील असतात. 

मनसे पक्षातर्फे त्यांना उमेदवारी दिल्यास नक्कीच फायदा होईल. विजयश्री खेचून आणण्यासाठी आम्ही मराठवाड्यातील महाराष्ट्र सैनिक सर्वोतोपरी हा गड जिंकण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही देत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी आमदार बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, अमित ठाकरे, आमदार राजू पाटील, अभिजित पानसे, सरचिटणीस व जिल्ह्याचे संपर्क प्रमुख दिलीप धोत्रे यांच्याकडे जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश साळुंखे, महेश जाधव, तुळजापूर तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, जनहित कक्ष व विधी विभाग तुळजापूर तालुकाध्यक्ष ॲड. मतीन बाडेवाले, लोहारा तालुकाध्यक्ष अतुल जाधव, उमरगा तालुकाध्यक्ष हरीभाऊ जाधव, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे, नळदुर्ग शहराध्यक्ष अलीम शेख, शहर सचिव प्रमोद कुलकर्णी, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, उमरगा शहराध्यक्ष हेमंत बनसोडे आदींनी उमेदवारीची मागणी केली आहे.

 
Top