तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

दिपावलीच्या सुट्या चालू असल्यामुळे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीराजवळ पास मोफत पास व सहशुल्क पास ची भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत आहे. त्याप पार्श्वभूमीवर येथील कमान वेस भागातुन यात्रेकरुची संख्या मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे त्या ठिकाणी ॲक्सीस पास व सहशुल्क पास चे काऊटंर उपलब्ध करावे, अशा प्रकारचे एक लेखी निवेदन कमान वेस भागातील पुजारी वर्गाच्या वतीने दि.१९ रोजी श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानकडे देण्यात आले आहे.

या निवेदनावर राजेश्वर कदम, नागेश कदम, राहुल कदम, विक्रम कदम आदीसह पुजारी बांधवाच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

 
Top