तुळजापूर : कुमार नाईकवाडी

तुळजापुर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे, कुत्रे, डुकरे फिरताना व रस्त्यावर बसलेली दिसत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यावर त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अशा उपद्रवी जनावरामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे. शहरात रस्त्यावरुन जात असताना लहान मुले माहिला वृद्ध नागरीकांना इजा व गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा मोकाट फिरणा-या जनावराच्या मालकानी आपआपली जनावरे तातडीने ताब्यात ठेवून त्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा नगर पालीका अधिनियम १९६५ व मुंबई पोलीस कायदा १९५१ मधील तरतुदी नुसार कडक कारवाई केली जाईल व मोकाट फिरत असलेली जनावरे डुकरे कुञे नगर परिषद कार्यालया मार्फत पकडून यांचा योग्य बंदोबस्त करुन त्यांची परवानगी गोशाळेमध्ये करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे आवाहन नगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 
Top