उस्मानाबाद, दि. 18 : तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीने सन 2019 ते 2020 मध्ये उस्मानाबाद समाज कल्याण बांधकाम विभाग यांच्याकडे असलेल्या 130 नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वाटप करण्यात आले.
कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पवार व सचिव रवी पवार यांनी बांधकाम कामगारासाठी शासनाकडून मिळणाऱ्या विविध शासकीय योजनेची माहिती गाव वाड्या वस्ती पर्यंत जनजागृतीच्या माध्यमातून करीत आहेत. दीपावली सणाचे औचित्य साधून तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीने कामगारांना अत्यावश्यक किटचे वाटप केले.
याप्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पवार, सचिव रवी पवार, कार्यकारी सदस्या कवीता पवार, जेवळीचे सरपंच मोहनजी पनूरे, चंद्रकांत ढोबळे, गुंडाप्पा कारभारी, गुणवंत ढोबळे, श्रीशैल ढोबळे, उमेश पवार सह कामगार मजूर उपस्थित होते.