नळदुर्ग, दि. 18 : तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी येथील सुमन लिंबराज कोरेकर यांचे दि.१८ रोजी सकाळी  ९ वाजण्याच्या सुमारास  अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्या ६९ वर्षाच्या होत्या.  त्या  बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक लिंबराज कोरेकर यांच्या धर्मपत्नी आणि कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांच्या मातोश्री होत. 

त्यांच्या पश्चात चार मुली, दोन मुले व नातवंडे असा परिवार आहे. तसेच बालाघाट शिक्षण संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर  त्यांचा अंत्यविधी ३. वा. सुमारास करण्यात आला.

 
Top