नळदुर्ग, दि. 17 : कोरोना रोगाच्या प्रतिबंधासाठी आता अनलॉक होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांचे क्रियात्मक कौशल्य वाढीस लागण्यासाठी व सृजनशीलतेचा विकास होण्यासाठी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरा जोपासण्यासाठी ज्ञानप्रबोधिनी पुणे व जि प केंद्र शाळा होर्टी ता. तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांना गटवार किल्ले बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली.
महाराष्ट्रातून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्हा परिषद होर्टी शाळेच्या विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. शिक्षक बसवराज माशाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर किल्ले बनवले.
या स्पर्धेचे निरीक्षक सुरेश दादा, निखील दादा व अनिल दादा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट व दिवाळीची मिठाई देण्यात आली. तसेच महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचा इतिहास जाणून घेऊन यापुढील काळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी आपली प्रगती करावी अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष मोरे, माजी सरपंच संजय गुंजीटे, उपसरपंच अशोक राजमाने व पालकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले. होर्टी जि.प.ची शाळा ही उपक्रमशील शाळा असून गुणवत्तेतही अव्वल आहे. रूपाली प्रदीप थोरे, श्रद्धा सुरेश राजमाने, शिवम माणिक गजेले, भक्ती विजयानंद टिकांबरे, दिशाराणी संतोष मोरे, सुजल अनंत सगर, पूजा ज्ञानेश्वर सगर, प्रिया सिद्धेश्वर राजमाने, यशराजे नानासाहेब गायकवाड इत्यादी 25 विद्यार्थ्यांनी किल्ले स्पर्धेत सहभाग नोंदवला.
यासाठी मुख्याध्यापक अरुण अंगुले, विजय चव्हाण, विजयकुमार कदम, बाबुराव चव्हाण, बालाजी माळी मारुती कोरे, हरिभाऊ कळबंडे, नितीन रामनबैनवाड, व्यंकट कोळी यांचे सहकार्य लाभले.