काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मरहुम नाजनिन युसूफ मुजावर यांचे द्धितीय पुण्यस्मरण व दिवाळीचे औचित्य साधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या भासत असलेल्या रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन येथील नाज फाऊंडेशन व मेडिकेअर रक्तपेढी, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शनिवार दि. 14 रोजी येथील अहिल्याबाई होळकर सभागृहात आयोजित भव्य रक्तदान शिबिरात 65 रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय उपक्रमात सहभाग नोंदविला.या शिबिरात रक्तदात्यांना प्रमाणपत्र व नाज फाऊंडेशनच्या वतीने भेटवस्तू म्हणून हेल्मेट देण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घघाटन नाज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. युसूफ मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच आदेश कोळी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा चेअरमन विक्रमसिंह देशमुख, नाज फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. युसूफ मुजावर, हेरार काझी, सतिश देशमुख, बबलू काझी संस्थेचे सचिव डॉ. अनिस मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते.