काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भवानी ग्रामविकास व संशोधन संस्थेच्या वतीने दीपावलीनिमित्त आयोजित मित्रपरिवार व ग्रामस्थांना फराळाचे स्नेह भोजन आणि कोरोना कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. अजित राठोड, तलाठी प्रशांत गुळवे, पत्रकार उमाजी गायकवाड, माजी सैनिक श्रीकांत गाटे, इसदाणी बेग, ग्रामपंचायत कर्मचारी अनिल बनसोडे, प्रशांत सुरवसे, विशाल सोनवणे, सुनिल भिसे, बबलू काझी, नजीब काझी, लक्ष्मण गायकवाड, पांडुरंग पाटील, मयुर संगपाक, पोलीस पाटील सौ. सुनंदा जामुवंत म्हेत्रे, अभिषेक बोराडे, साजन क्षिरसागर आदीसह 22 जणांना शाल, श्रीफळ, व सन्मानपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भवानी ग्रामविकास व संशोधन संस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश कोळी होते. प्रारंभी गावात कोरोना कालावधीत कोरोना रोखण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 22 कोरोना योद्धांचा सत्कार करुन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मित्रपरिवार व ग्रामस्थांना फराळाचे स्नेह भोजन देण्यात आले.
यावेळी आयोजन समितीच्या वतीने बोलताना भवानी ग्रामविकास व संशोधन संस्थेचे अध्यक्ष अविनाश कोळी म्हणाले की, कोरोना साथीचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला साथ देणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून काटी ग्रामपंचायतने आणि ग्रामस्थांनी आपल्या चौकस व स्वयंशिस्तीने व शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या पालनामुळे, सर्वांनी एकत्र येऊन घेतलेल्या योग्य खबरदारीमुळे, स्वयंशिस्तीमुळे कोरोनाला रोखण्यास यश मिळविले असले व काटी गाव बिनधास्त "कोरोना फ्री " आयुष्य जगत असले तरी कोरोना टाळण्यासाठी प्रत्येकाने मास्क घालून आपल्या कुटुंबीयांना कोरोना पासून दूर ठेवावे, असे आवाहन करतानाच कोरोना आजार टाळण्यासाठी मास्क वापरणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, सरपंच आदेश कोळी, डॉ. अजित राठोड, डॉ.युसूफ मुजावर, डॉ. अनिस मुजावर,नाशेर काझी, पत्रकार उमाजी गायकवाड, अरविंद कोळी, जालिंदर कोळी, ग्रा.प. सदस्य मकरंद देशमुख, बाळासाहेब भाले, जितेंद्र गुंड, अतुल सराफ, दत्ता सोनवणे,माजी सैनिक श्रीकांत गाटे, तलाठी प्रशांत गुळवे,करीम बेग, सेवानिवृत्त तहसीलदार राठोड, बबलू काझी, रविंद्र देशमुख व सचिन इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.