जळकोट : मेघराज किलजे

श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ व दत्त मंडळ, आष्टा (कासार) ता. लोहारा यांच्या वतीने पाडव्याच्या शुभमुहूर्तावर व मंदिरे खुली झाली याच्या आनंदाप्रीत्यर्थ देवासमान कार्य करणाऱ्या डॉक्टर, आशा कार्यकर्त्या पोलीस प्रशासन, शिक्षण संस्था व दानशूर व्यक्ती यांचा यथोचित सत्कार करून गौरव करण्यात आला.

यामध्ये सत्कारमूर्ती म्हणून डॉ. शशिकांत सोमवंशी, डॉ.शिवराज कुडकले, डॉ.अमोल पांढरे, डॉ.बलभीम अष्टेकर, डॉ.सचिन अल्लिशे, डॉ. बाबासाहेब सुलतानपूरे, डॉ.शिवकन्या नवटाके, डॉ. पंकज चौधरी तसेच माजी सरपंच सुनील सुलतानपुरे, पोलीस प्रशासनामध्ये कर्तव्य पार पाडत असलेले बापट चौधरी, पोलीस पाटील संजीवनी व्यंकट चौधरी, आष्टा  हायस्कूल आष्टा(कासार)चे मुख्याध्यापक गोविंद काजळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुभाष नागणे, मेडिकल सेवा देणारे खंडू सुलतानपूरे व तसेच सर्व आशा  कार्यकर्त्या व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करणारे शिवमूर्ती फुंडीपल्ले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत लोहारा तालुक्यातून प्रथम  येत शिष्यवृत्तीधारक  झालेली कु. कादंबरी कुडकले या विद्यार्थिनीचा सत्कार मंडळाकडून करण्यात आला.

अध्यक्षस्थान ह.भ.प. दिलीप पाटील यांनी भूषविले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय सोमवंशी, प्रा.गोविंद इंगोले, निशिकांत सोमवंशी, ज्ञानेश्वर चव्हाण, आपु आळंगे, मुकेश मुळे, रवींद्र शिदोरे, ज्ञानेश्वर मोरे, नवनाथ दासीमे, धनराज कुडकले, सचिन दासीमे, सौदागर हिंगमिरे, संतोष सोमवंशी, महेश दासीमे व शंभू मदने, यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद पोतदार तर  प्रास्ताविक डॉ.संजय सोमवंशी यांनी केले. याप्रसंगी डॉ. प्रमोद सोमवंशी यांनी विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता अध्यक्षीय समारोपाने झाली.कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top