जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट बीट मधील आय एस. ओ. मानांकन प्राप्त जि. प .मानमोडी शाळेस सामाजिक कार्यकर्ते डॉ. सिद्राम खजुरे ,केंद्रप्रमुख प्रकाश राठोड, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सालेगावे व खुदावाडीचे प्रतिष्ठित नागरिक सिद्धांत कबाडे यांनी शाळेस भेट दिली.
यावेळी शाळेतील ई लर्निंग, प्रोजेक्टर डिजिटल शाळा, ऑनलाइन अभ्यासक्रम माहिती ,शालेय परिसर, शाळेतील राबवण्यात आलेले उपक्रम, ड्रिप व तुषार सिंचन द्वारे निर्माण करण्यात आलेली भाजीपाला बाग, शाळेचे अद्यावत रेकॉर्ड पाहून डॉ. खजुरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक विक्रम पाचंगे, रमेश दूधभाते रामकृष्ण मोहिते, श्रीमती सुचिता चव्हाण, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष संदिपान गुंजकर ,उपाध्यक्ष शुभांगी सुरवसे, बीट विस्ताराधिकारी जी.एन.सर्जे, केंद्रप्रमुख अरुण अंगुले तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे शाळेसाठी असणारे सहकार्य पाहून खजुरे यांनी कौतुक केले.