उस्मानाबाद, दि. 11 : प्रति माह सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी- अंमलदारांचा निरोप समारंभ हा पोलीस मुख्यालयात महिना अखेरीस नियमीतपणे आयोजित केला जातो. लॉकडाऊन काळात उस्मानाबाद पोलीस दलातील अधिकारी-अंमलदार अशा 45 व्यक्ती सेवानिवृत्त झाल्या होत्या. परंतु कोविड- 19 संबंधी सोशल डिस्टन्सींग-गर्दी संबंधी मनाई आदेशांचे पालन करण्याच्या हेतुने त्यांचा निरोप समारंभ पुढे ढकलण्यात आला होता. काल दि. 10 व आज दि. 11.11.2020 असा दोन टप्प्यांत त्यांचा निरोप समारंभ पोलीस मुख्यालयातील ‘अलंकार सभागृहात’ मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप भा. पालवे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. 

सत्कारादरम्यान मा. पोलीस अधीक्षक सो व मा. अपर पोलीस अधीक्षक सो यांनी त्यांच्या भावी जिवनास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास सेवानिवृत्त झालेले 5 पोलीस अधिकारी व 40 पोलीस अंमलदार हे कुटूंबीयांसह उपस्थित होते. सत्कारादरम्यान नोकरीतील अनुभव कथन करतांना सेवानिवृत्त अधिकारी- अंमलदार यांचे डोळे पानावले. 

 
Top