उस्मानाबाद, दि. 11 : गंगा मनोज साठे, रा. श्रीकृष्ण नगर, एमआयडीसी रोड, उस्मानाबाद या दि. 10.11.2020 रोजी 15.15 वा. सु. श्रीकृष्ण नगर येथील रस्त्याने पायी चालत जात होत्या. यावेळी एका धावत्या मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी पुरुषांनी गंगा साठे यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम सोन्याचे गंठन हिसकावुन नेले. अशा मजकुराच्या गंगा साठे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


नळदुर्ग, दि. 11 : अनंत माणिकराव चिनगुंडे, रा. नंदगांव, ता. तुळजापूर (ह.मु. जळकोट, ता. तुळजापूर) हे दि. 09 ते 10.11.2020 रोजीच्या कालावधीत गावी गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून घरातील 15 ग्रॅम सोन्याचे दागिने, व्हिडोओकॉन कंपणीचा कॅमेरा, विवो मोबाईल फोन व रोख रक्कम 2,500/-रु. असा एकुण 53,000/-रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या अनंत चिनगुंडे यांनी काल दि. 10.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


भुम, दि. 11 : जोतीराम प्रमोद भसाड, रा. पाथ्रुड, ता. भुम यांनी स्वत:ची बोलोरो गाडी क्र. एम.एच. 13 एझेड 2124 ही दि. 09.11.2020 रोजी 11.00 वा. सु. पाथ्रुड येथील ‘हॉटेल साई दरबार’ समोर लावली होती. ती त्यांना दि. 10.11.2020 रोजी 06.00 वा. सु. लावल्या जागी न आढळल्याने ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या जोतीराम भसाड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


उमरगा, दि. 11 : दस्तगीर रुक्मोद्दीन पटेल, रा. मुळज, ता. उमरगा यांनी स्वत:ची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 13 एई 6264 ही दि. 27.10.2020 रोजी 10.00 वा. सु. बस डेपो, उमरगा येथे लावली होती. ती त्यांना दि. 29.10.2020 रोजी 18.00 रोजी लावल्या जागी न आढळल्याने ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या दस्तगीर पटेल यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top