उस्मानाबाद, दि. 11 : रोटरी क्लब ऑफ उस्मानाबाद तर्फे सोमवार दि.9 रोजी यशवंत व गुणवंत विध्यार्थी व अर्जुन पुरस्कार प्राप्त क्रिडा अधिकारी कु. सारिका काळे याचा सत्कार मान्यवरांचे हस्ते संपन्न झाला.

भारतीय खोखो संघाची कर्णधार व अर्जुन पुरस्कार विजेती कु.सारिका काळे या सध्या तुळजापर येथे तालुका क्रिडाधिकारी या पदावर कार्यरत असून त्यांचा शालेय जीवनापासूनचा 2001ते2020 प्रवास हा अतिशय खडतर असाच आहे.त्यांचा जन्म 30मे 1993 रोजी सामान्य कुटुंबात झाला .शालेय जीवनापासूनच खोखो खेळाची आवड तसेच प्रा.डाॅ.चंद्रजीत जाधव यांचे सारखे मार्गदर्शक लाभल्यामुळे घवघवीत यश मिळत गेले. स्वतःचे परिश्रम,जिध्द,चिकाटी यामुळे उत्तरोत्तर उतुंग शिखर गाठता आले.

2006 या वर्षी इंदोर येथे झालेल्या 28 व्या ज्युनियर नॅशनल खोखो स्पर्धेत सर्वप्रथम सहभाग घेतला व सुवर्णपदक मिळाले.2007 साली विशाखापट्टनम येथे झालेल्या 52 व्या राष्ट्रीय शालेय(14 वर्षा खालील) स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले.2008 साली विजापूर येथे झालेल्या 53 व्या राष्ट्रीय शालेय(17 वर्षा खालील) स्पर्धेत रजत पदक मिळाले.2008 सालीच पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या 54 व्या राष्ट्रीय शालेय(17 वर्षाखालील) स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले.2009 मध्ये गोवा येथे झालेल्या 35 व्या राष्ट्रीय महिला स्पर्धेत ब्राॅझ पदक मिळाले.2010 मध्ये गोवा येथे झालेल्या 29 व्या राष्ट्रीय कनिष्ट स्पर्धेत रजत पदक मिळाले.

2010 मध्ये अमृतसर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय(19 वर्षा खालील)स्पर्धेत रजत पदक मिळाले.2010 मध्येच मुंब ई येथे झालेल्या 44 व्या वरिष्ट राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले.2010 मध्ये छत्तीसगड येथे झालेल्या 30 व्या कनिष्ट राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले.2012 मध्ये बंगळुरू येथे झालेल्या 22 व्या फेडरेशन कप स्पर्धेत ब्राॅझ पदक मिळाले.2012 मध्येच बारामती येथे झालेल्या 46 व्या वरिष्ट राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले.2013 मध्ये कर्नाटकात झालेल्या 39 व्या महिला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले.हा पदकांचा सिलसिला दक्षिण अशिया खोखो स्पर्धा,3र्या अशियाई स्पर्धा,पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा(लंडन) 2018 पर्यंत सुरूच राहिला.

या स्पर्धामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.या शिवाय 2011 साली जिल्हा क्रिडा पुरस्कार,2015 साली राणी लक्ष्मीबाई पुरस्कार,2015-16 शिवछत्रपती अवार्ड तर 2020 या वर्षी भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला आहे.याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने थेट तालुका क्रिडा अधिकारी पदी नेमणुक केली आहे.उस्मानाबाद रोटरीनेही भव्य सत्कार केला आहे.

रोटरीचे अध्यक्ष अमरसिंह बाजीराव देशमुख,सचिव इंद्रजित आखाडे,उपप्रांतपाल भरत जाधव यांचे हस्ते कु.सारीका सुधाकर काळे,प्रेरणा प्रसाद देशमुख(IITमद्रास येथे प्रवेश),वेदा धनंजय पाटील(NEET-595),अमेय सचिन देशमुख(NEET-665),साक्षी विजयसिंह देशमुख(फार्मसी),ज्योतिरादित्य इंद्रजित आखाडे(ssc-80%)  या गुणवंत्तांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, सचिव इंद्रजित आखाडे, उपप्रांतपाल भरत जाधव, रविंद्र साळुंके, नंदकुमार पिंपळे, चित्रसेन राजेनिंबाळकर, धनंजय वाकुरे, प्रशांत पाटील, डॉ. धनंजय पाटील, डॉ. सचिन देशमुख, प्रसाद देशमुख, सुधाकर भोसले, सुरज कदम, सुनिल गर्जे, शशिकांत वराळे, अशोक मंत्री, कुणाल गांधी, अमोल माने, चंदन भडंगे, रणजित रणदिवे ,अभिजीत पवार हे रोटेरिअन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रो. नंदकुमार पिंपळे यांनी केले.

 
Top