काटी : उमाजी गायकवाड
करोना व्हायरसच्या संकटामुळे राज्यात वाहतूक सेवा बंद होती. आता काटी येथील पुणेस्थित उद्योजक वाहेद मुबारक इनामदार यांनी काटी-पुणे व्हाया वैराग,बार्शी, कुर्डुवाडी, टेंभुर्णी मार्गे खाजगी इनामदार लक्झरी निमआराम बससेवा मंगळवार दि. 10 पासून काटी येथून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. ऐन दिवाळीच्या सणाच्या धामधूमीत हि बस सेवा सुरु झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या बसमुळे काटीसह परिसरातील जवळपास बारा ते पंधरा गावातील नागरिकांना व पुण्यातून आपल्या गावाकडे निश्चित स्थळी जाता-येता येणार आहे. या लक्झरी बससेवेमुळे काटीसह परिसरातील बारा ते पंधरा गावातील प्रवाशांची काटी ते पुणे येणे जाणेसाठी सोय झाली असून हि बस सेवा नियमितपणे काटी येथून संध्याकाळी बरोबर 9 वाजता निघणार वैरागला 9:30 ला तर बार्शीला 10:15 ला पोहंचणार आहे. बार्शी येथून 10:30 वाजता कुर्डुवाडी, टेंभुर्णी मार्गे पुणेला निघणार असून पुण्यातील स्वारगेटला पहाटे 4:30 वाजता पोचणार आहे. तर पुण्यातील स्वारगेटहुन दुपारी एक वाजता हि बस काटीला निघणार असून काटी येथे सहा वाजता पोचणार आहे.
ही गाडी स्लिपर कोच नसून आसणी(सीटर) आहे व ही लक्झरी बस सेवा पुण्यातील स्वारगेट पर्यंत असणार असल्याची माहिती लक्झरी बसचे सर्वेसर्वा वाहेद इनामदार यांनी दिली. हि बस सेवा सुरु झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या बस सेवा शुभारंभ प्रसंगी माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, प्रहार संघटनेचे सयाजी प्रतापराव देशमुख, सरपंच आदेश कोळी, सुजित हंगरगेकर, अमरसिंह निंबाळकर, मकरंद देशमुख, वाहेद इनामदार, करीम बेग, अहमद पठाण, जाहेद इनामदार, तबारक इनामदार, बिलाल इनामदार, धनाजी गायकवाड, सुनिल परिट, हेरार काझी, माजीद इनामदार, साजीद इनामदार, कालिदास शिंदे, श्रीहरी ढगे, राजेंद्र हांडे, विरसिंह देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.